कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती; 102 बंधारे पाण्याखाली, अनेक इमारतींत पाणी घुसले

429

जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून पुन्हा दमदार आगमन झालेल्या आणि रात्रीपासून धुवाधार कोसळणाऱ्य़ा पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाल्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने, सायंकाळपर्यंत 102 बंधारे पाण्याखाली गेले होते. शहरातील नाल्यालगतच्या अनेक इमारतींत पाणी घुसले. 6 राज्यमार्ग, 20 प्रमुख जिल्हा मार्ग असे 32 मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत.

गेल्या महिन्यापूर्वी दोन वेळा पात्रालगत वाहणाऱ्य़ा पंचगंगा नदीचे पाणी आज सकाळी यंदा प्रथमच पात्राबाहेर पडले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासांत तब्बल 17.5 फूट वाढ होऊन, पाणीपातळी 37.5 फुटांवर पोहोचली होती. धोका पातळी 43 फूट असलेल्या पंचगंगेची आज रात्रीच काही तासांत 39 फुटांची इशारा पातळी ओलांडण्याच्या शक्यतेने नदीकाठच्या नागरिकांना जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक बोटी असलेल्या गावात विशेषतः शिरोळ तालुक्यात बोटी चालविण्यासाठी लाईफ जॅकेट सक्तीचे केले पाहिजे. त्यासाठी गावांत 10-10 लाईफ जॅकेट द्यावेत, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या