उपनगरातील उड्डाणपुलांखाली बगीचे बहरणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रंगीबेरंगी फुले, लॉन, जॉगिंग ट्रक आणि बैठक व्यवस्था पूर्व उपनगरातील उड्डाणपुलांखाली करण्यात येणार आहे. तब्बल 1 लाख 79 हजार चौरस फूट जागेवर होणाऱ्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात नऊ उद्याने साकारण्यात येणार आहेत. उड्डाणपुलांखाली मोकळ्या जागेत साकारण्यात येणाऱ्या नऊ उद्यानांमध्ये रहिवाशांसाठी अद्ययावत सुविधा देण्यात येणार आहेत. यासोबत या उद्यानांमध्ये कमी वीज खर्चात प्रकाश देणाऱ्या ‘एलईडी’सारख्या दिव्याचा वापर करून आकर्षक रोषणाईदेखील केली जाणार आहे.

उद्यानांमध्ये झाडे लावताना ती केगकेगळ्या रंगाची असतील. यासाठी हेमालिया, दुरांटा, प्लंबॅगो, माल्पिजिया, ऍकॅलिफा, क्रोटॉन, बोगनकेल, सॅप्लेरा, फायकस, ऍरेका पाम, राफीस पाम आणि इक्झोरा यासारखी किकिध रंगी झाडे या उद्यानांमध्ये लाकली जाणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जीतेंद्र परदेशी यांनी दिली. या उद्यानांच्या उभारणीसाठी 7 कोटी 33 लाख इतका खर्च येणार आहे. याबाबतची निकिदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून स्थायी समितीच्या मंजुरीनंतर कार्यादेश देण्यात येतील.

या उड्डाणपुलांखाली होणार उद्याने

  • ‘सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड’वरील उड्डाणपूल, 10 हजार 225 चौरस फुटांची जागा
  • ‘मानखुर्द ’टी जंक्शन’ उड्डाणपूल, 79 हजार 254 चौरस फुटांची जागा
  • प्री वे उड्डाणपूल, गोवंडी-ईस्टर्न फ्री वे, 17 हजार 222 चौरस फुटांची जागा,
  • ‘रामकृष्ण चेंबूरकर मार्ग उड्डाणपूल’, 11 हजार 840 चौरस फुटांची जागा