
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रेडिओवरून पाकिस्तान करत असलेल्या हिंदुस्थानविरोधी प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी अमृतसरनजीकच्या सीमा भागात ऑल इंडिया रेडिओने एफएम स्टेशन सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय साम्पला यांच्या हस्ते करण्यात आले. या एफएम केंद्राला पाकिस्तानात 50 कि.मी.पर्यंत ऐकता येणार आहे. या केंद्रामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांतील पंजाबी भाषिक लोकांमध्ये संवाद घडेल, असे साम्पला यांनी सांगितले.





















































