लोककलावंतांचे आजपासून आमरण उपोषण, सांस्कृतिक खात्यावर कलावंत नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळातील पॅकेजचे अनुदान देण्याच्या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील लोककलावंत उद्या बुधवारपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत.

राज्यातील लोकनाटय़ मंडळ खडीगंमत, दशावतार, शाहीर, टुरिंग टॉकीज, सर्कस, ऑर्केस्ट्रा, लावणी, भारूड आणि इतर लोककला प्रकाराच्या फडमालक आणि निर्मात्यांना कोरोना पॅकेजचे अनुदान मिळण्याबाबत अनेक वेळा निवेदनेही देण्यात आली. परंतु सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाने आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने याची अद्याप दखल घेतली नाही. म्हणूनच हे आंदोलन करण्यात येत असल्याचे लोकनाटय़, लोककलावंत मराठी परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला अनेक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.