
व्हॉट्सऍप हे फक्त चॅटिंग ऍप नसून त्याच्या मदतीने अनेक कामे करणे सहज शक्य होते. मात्र व्हॉट्सऍप हॅक होण्याची भीती वाटत असेल तर या ट्रिक्स जाणून घ्या.
अकाऊंट हॅकिंगपासून वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे टू-स्टेप व्हेरिफिकेशन. हे फिचर ऑन झाल्यानंतर व्हॉट्सऍप लॉग इनसाठी सहा अंकी पिन प्रविष्ट करावा लागेल.
पिनशिवाय कोणीही तुमचे खाते ऍक्सेस करू शकत नाही. हे फिचर व्हॉट्सऍपच्या सेटिंग्जमधील अकाऊंट विभागात सहजपणे सक्रिय केले जाते.
व्हॉट्सऍप आता पास-की पर्याय देत आहे. पास-की ऑन झाल्यानंतर व्हॉट्सऍप अकाऊंट फोनच्या बायोमेट्रिक सुरक्षिततेशी जोडले जाते.
व्हॉट्सऍपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन अकाऊंट पर्यायाखाली पास-कीवर टॅप केल्यास हॅकर्सना तुमच्या व्हॉट्सऍप अकाऊंटमध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण होते.





























































