फ्रिजमध्ये ठेवूनही खराब होऊ शकतात ‘हे’ खाद्यपदार्थ

4424

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या प्रत्येकाकडे वेळेची कमतरता आहे. याचाच परिणाम म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळेची अनियमितता. त्यामुळे अनेक लोक मुद्दाम दोन वेळेचे जेवण एकदाच बनवून फ्रिजमध्ये ठेवतात. फ्रिजमध्ये ठेवलेले काही पदार्थ हे काही काळाने खराब होतात व त्यामुळे तसे पदार्थ खाल्ल्याने आपली तब्येत देखील बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहोत जे फ्रिजमध्ये विशिष्ट वेळेपेक्षा जास्त वेळ ठेवल्यास खराब होतात.

लोणी –  लोणी फ्रिजमध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ ठेवू नये. आपल्याकडे चांगल्या प्रतीचे प्लास्टिक असल्यास त्यात गुंडाळून ते अधिक दिवस फ्रिजमध्ये ठेवू शकता. लोण्याचा वापर करण्यापूर्वी सुमारे 15 मिनिटे आधी ते रेफ्रिजरेटरमधून काढा आणि मग त्याचा वापर करा.

दूध – फ्रिजमधून दूध बाहेर काढल्यास हवं तितकं दूध एका भांड्यात घेल्यानंतर उर्वरित दूध लगेच फ्रिजमध्ये ठेवा. दुधात बॅक्टेरिया लवकर वाढतात. जर तुम्ही फ्रिजमधून दूध बाहेर काढल्यानंतर दुधाला 2 तास बाहेर ठेवले असेल तर, ते वापरू नका.

नॉनव्हेज – ज्यांना नॉनव्हेज आवडत, ते बरेच दिवस नॉनव्हेज फ्रीजमध्ये ठेवूनही खातात. जर तुम्ही शिजलेले मांस फ्रिजमध्ये ठेवले तर ते दिवसातच खाऊन संपवा. अन्यथा ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कच्चे मांस देखील जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये.

अंडी- अंडी फ्रिजबाहेर एक महिन्यापर्यंत व्यवस्थित राहतात. मात्र फ्रिजमध्ये 5 आठवड्यांपेक्षा जास्त काळ अंडी ठेवू नये.

आपली प्रतिक्रिया द्या