
अमेरिकेत जाण्यासाठी तुम्ही तयारी करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण अमेरिका भेटीची योजना आखणाऱ्यांना – B1 (व्यवसाय) आणि B2 (पर्यटक) – सुमारे तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल, अर्जदारांसाठी प्रतीक्षा काळ 1,000 दिवसांच्या जवळपास आहे. अमेरिकेच्या डिपार्टमेंटच्या वेबसाइटवरून अशी माहिती मिळते आहे की B1/B2 व्हिसा मुलाखतीसाठी प्रतीक्षा कालावधी 961 दिवस आहे (23 नोव्हेंबर रोजी). परराष्ट्र विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करतानाच युनायटेड स्टेट्समध्ये कायदेशीर प्रवास सुलभ करण्यासाठी ते वचनबद्ध आहे.
मुंबईत राहणाऱ्यांसाठी, प्रतीक्षा काळ 999 दिवस आणि हैदराबादसाठी 994 दिवस आहे. चेन्नईच्या रहिवाशांना अपॉइंटमेंट मिळण्यासाठी 948 दिवस प्रतीक्षा करावी लागेल, तर केरळमध्ये, राज्य विभागाच्या वेबसाइटनुसार, प्रतीक्षा कालावधी 904 दिवस आहे.
‘अमेरिकन दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात मुलाखतीची अपॉईंटमेंट मिळण्याचा अंदाजे प्रतीक्षा काळ दर आठवड्याला बदलू शकते आणि प्रत्यक्ष येणार्या वर्कलोड आणि स्टाफिंगवर आधारित आहे. हे फक्त अंदाज आहेत निश्चित वेळ नाही’, असे सांगण्यात येत आहे.
सप्टेंबरमध्ये अमेरिकेला भेट देणारे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याकडे व्हिसा अर्जांच्या अनुशेषाचा मुद्दा उपस्थित केला होता. अमेरिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की ते या विषयावर ‘अत्यंत संवेदनशील’ आहेत आणि त्यांना कोविडमुळे जगभरात अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.’
गेल्या आठवड्यात, स्टेट डिपार्टमेंटने सांगितले की यूएस व्हिसा प्रक्रिया अधिक वेगाने होत आहे आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये ते पूर्वपदावर पोहोचण्याची अपेक्षा आहे.
विलंबाचे कारण देताना, यूएस व्हिसासाठी अनेक अर्जदारांना देशाच्या कायद्यानुसार वैयक्तिकरित्या उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र कोविडच्या कारणास्तव असलेल्या अनेक ठिकाणच्या निर्बंधांमुळे व्हिसा अर्जदारांना प्रत्यक्ष भेट देण्याची आमची क्षमता कमी झाली आहे.



























































