
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरीत आज सकाळी पावसाने झोडपून काढले. पुढील तीन दिवस रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रत्नागिरी जिल्हयात गेल्या २४ तासात सरासरी ४१.७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. आकडे मिलीमीटर मध्ये आहेत. मंडणगड- ४८.०० , दापोली- ७७.००, खेड- ३८.००, गुहागर-२७.००, चिपळूण-४५.००, संगमेश्वर-१२.००, रत्नागिरी-८.००, लांजा ४३.०० आणि राजापूर तालुक्यात ७८.०० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
०३ जुलै २०१८ रोजी सकाळी १० वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार संगमेश्वर तालुक्यातील मौजे किरबेट येथे संजय काशिनाथ पांचाळ यांचे घराचे पावसामुळे अंशत: २३ हजार ७५० रुपये नुकसान झाल्याचे जिल्हा नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.
हवामान खात्याकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार ०४ जुलै ते ०७ जुलै २०१८ या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
































































