आता तस्करांची ‘खैर’ नाही, वनविभागाने लावला 10 कोटींच्या खैर तस्करीचा छडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

पानाचा विडा रंगवण्यासाठी आणि पानमसाल्याची चव वाढवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वापरण्यात येणाऱया काताच्या उत्पादनासाठी बेकादा खैराची तस्करी करणाऱया त्रिपुटाच्या मुसक्या ठाण्यात वनविभागाने आवळल्या आहेत. वनविभागाच्या या धडाकेबाज कारवाईत 10 कोटी 80 लाख रुपयांच्या तब्बल 90 ट्रक खैराच्या तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.

ठाण्याच्या विभागीय वनाधिकाऱयांनी कळवा ते वडखळ असा पाठलाग करून खैराची वाहतूक करणारा ट्रक काही दिवसांपूर्वी पकडला आणि कोटय़वधी रुपयांच्या तस्करीचा छडा लागला. वनाधिकाऱयांनी या प्रकरणी अटक केलेले इरफान खलपे, सुरेश मोहिते, सलीम माखजनकर हे तिघे अट्टल गुन्हेगार असून काही वर्षांपूर्वी पडघा येथे वनाधिकाऱयांवरही त्यांनी हल्ले केल्याचा त्यांचा क्राइम रेका@र्ड आहे. तपासात आरोपी इरफान खलपे याने गेल्या आठ महिन्यांत 90 ट्रक खैर चिपळून येथे पाठवले असल्याचे कबूल केले. रायगड येथील जंगलातून अवैधरीत्या खैरांची झाडे तोडून ही लाकडे चिपळून-सावर्डे येथे कात बनवणाऱया व्यापाऱयांना पुरवण्यात येत होती, अशी माहिती खलपेने तपासात दिली. इतकेच नव्हे तर ठाण्यात पडघ, बोरिवली, राहूर येथेही व्यापाऱयांना मोठय़ा प्रमाणात कात बनवण्यासाठी खैराची लाकडे विकण्यात आली आहेत.

वाडय़ातही 60 ट्रक साग, खैर जप्त
वाडा वनविभागाच्या अधिकाऱयांनीही वाडा- मनोर राज्य महामार्गालगत असलेल्या ठाणगेपाडा येथील दास्तान डेपोवर छापा टापून 60 ट्रक साग, खैर लापूड साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या संपूर्ण लाकडांची किंमत 40 लाखांहून अधिक आहे. या डेपोपासूनच अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आलमान गावातील काही शेतकऱयांच्या खासगी मालकीतील साग, खैर झाडे विनापरवाना तोडून त्याचा साठा ठाणगेपाडा येथील सुनील आंबवणे यांच्या मालकीच्या दास्तान डेपोवर ठेवण्यात आला होता, अशी माहिती वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांनी दिली.