
खेड तालुक्यातील सातवीन गाव येथील वनविभागाच्या आरक्षित जागेत लागलेल्या आगीत लाखो रुपयांची वनसंपदा जाळून खाक झाली झाली. खेड येथील वनविभागाच्या अधिकारांच्या नाकर्तेपणामुळे आतापर्यंत या परिसरात तीन वेळ वणवा लागला आहे.
ग्रामस्थ सुमारे चार तास या वणव्याशी झुंज देत होते. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला मात्र त्याचे फोन नॉट रिचेबल होते.
तालुक्यातील सात्त्विन गाव येथे वनविभाच्या मालकीची 450 एकर जागा आहे. या जागेत वेगवेळ्या प्रकारची झाडे, औषधी वनस्पती आहेत. शिवाय अनेक वन्य जीवांसाठी हे आरक्षित जंगल म्हणजे नैसगिर्क अधिवास आहे.
या परिसरात या आधीही दोन वेळा वणवा लागला होता. त्यामुळे वनविभागाने वणवा लागणार नाही यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र वनविभागाच्या भोंगळ कारभारामळे तशी कोणतीही उपाययोजना केली गेली नसल्याने या परिसरात पुन्हा वणवा लागला आणि लाखो रुपयांची वनसंपदा जाळून खाक झाली. या आगीत सरपटणारे प्राणी, तसे अन्य वन्यप्राणीही जखमी किंवा मृत्यू पावल्याची शक्य आहे.
गावातील रोहिदास गुरव, इस्माईल कादरी, अखतर घरे, बशीर बोट यांनी तत्काळ लोटे एमआयडीसी च्या अग्निशामक बंबाला पाचारण केले. बंब येईपर्यंत या ग्रामस्थांनी आग विझवण्यास सुरवात केली होती. वनविभागाचे अधिकारी आग विझल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.





























































