
आसाममधील कछार जिल्ह्यातील लखीपूर वन क्षेत्रातील अधिकाऱ्याला लाचेच्या रकमेसह अटक करण्यात आली आहे. वनसंपदेच्या तस्करीसाठी त्याने ही लाच स्वीकारली होती. वनक्षेत्र अधिकारी देवव्रत गोगोई यांच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधत विभागाने छापेमारी केली होती. छापा पडल्याचे कळताच गोगोई लाचेच्या रकमेसह कार्यालयातून फरार झाले. त्यांना पळालेलं पाहताच पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. गोगोई पळत होते आणि अधिकारी त्यांच्या मागावर होते. जवळपास 1 किलोमीटर पर्यंत धावल्यानंतर गोगोई यांना अधिकाऱ्यांनी पकडलं आणि त्यांच्या हातातील लाचेची रक्कम हिसकावून घेत जप्त केली.
Our fight against corruption continues. Today, a team from @DIR_VAC_ASSAM caught red-handed the Forest Range Officer, Lakhipur. Shri Debabrata Gogoi Cachar district with accepted bribe money. @assampolice @CMOfficeAssam pic.twitter.com/eBcuDPi4dT
— GP Singh (@gpsinghips) August 3, 2022
आसामचे विशेष पोलीस महासंचालक जीपी सिंह यांनी या कारवाईची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. गोगोई यांना अटक करण्यात आली असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. गोगोई यांच्या गुवाहाटी आणि जोरहाट भागातील निवासस्थानांवरही पोलिसांनी छापेमारी केली आहे.
The one KM hot chase at Silchar that ended in arrest of Forest Ranger Debabrata Gogoi. Corrupt cannot run away from @DIR_VAC_ASSAM @assampolice @CMOfficeAssam pic.twitter.com/cfBJITrfId
— GP Singh (@gpsinghips) August 3, 2022



























































