
अमेरिकेच्या एफबीआय अर्थात सिक्रेट सर्व्हिस आणि फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे माजी प्रमुख जेम्स कॉमी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला फोटो आणि पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या पोस्टचा संबंध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या कटाशी जोडला जात असून एफबीआयने याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. अमेरिकेच्या होमलॅण्ड सिक्युरिटी सचिव क्रिस्टी नोएम आणि रिपब्लिकनच्या नेत्यांनी कॉमी यांच्या पोस्टचा ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी संबंध असल्याचा दावा केला आहे.