
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याप्रकरणी न्यायलयाने चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना 50 लाखांचे दंडही ठोठावला असून त्यांच्या चार मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Former Haryana CM Om Prakash Chautala gets 4 years jail in disproportionate assets case
Read @ANI Story | https://t.co/QdptOyngJW#OPChautala #Disproportionateassetscase #Haryana pic.twitter.com/9ujil7njBX
— ANI Digital (@ani_digital) May 27, 2022
ओमप्रकाश चौटाला यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याप्रकरणी दिल्लीतील राऊज एवेन्यू न्यायालयाने दोषी ठरवले होते. या प्रकरणी सीबीआयने 26 मार्च 2010 रोजी चौटाला यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यांना 1993 ते 2006 या काळात उत्पन्नापेक्षा अधिक म्हणजे 6.09 कोटी रुपये संपत्ती जमवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. तर 2019 मध्ये ईडीने ओमप्रकाश चौटाला यांची 3 कोटी 68 लाखांची संपत्ती जप्त केली होती. नवी दिल्ली, पंचकुला आणि सिरसामधील त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. ही कारवाई उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.
चौटाला यांनी वयाच्या 87 व्या वर्षी 10 आणि 12 वीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्याने ते काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते.


























































