21 गुणांची शान धोक्यात, आता 15 गुणांचा प्रयोग; बीडब्ल्यूएफचा निर्णय वादग्रस्त; विमल कुमारांचा रोष उसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दशकांपूर्वी बॅडमिंटनमध्ये केलेला 21 गुणांचा निर्णय पुन्हा बदलला जाणार आहे. 21 गुणांमुळे शानदार झालेल्या या खेळाला पुन्हा 15 गुणांवर आणण्याचा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) घेतला आहे. त्यांनी आपल्या गुणपद्धतीत पुन्हा मागे जात 15 गुणांची नवी पद्धत मंजूर केली. डेन्मार्पमधील हॉर्सेन्स येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन तृतीयांश बहुमताने हा निर्णय झाला असून 4 जानेवारी 2027 पासून तो लागू होणार आहे.

21 गुण पद्धतीचा प्रवास

2006 पूर्वी बॅडमिंटनमध्ये 15 गुणांची पारंपरिक सर्व्हिस पद्धत होती, ज्यात फक्त सर्व्ह करणाऱयालाच गुण मिळायचे. मात्र 2006 मध्ये बीडब्ल्यूएफने 21 गुणांची रॅली गुण पद्धत लागू केली, ज्यामुळे प्रत्येक फेरीला गुण मिळू लागले. त्यामुळे खेळ अधिक वेगवान आणि प्रेक्षकप्रिय बनला आणि हीच पद्धत बॅडमिंटनची ओळख ठरली. शान ठरली.

हा बदल नव्हे, खेळाची धार बोथट!

हा बदल नव्हे, खेळाची गुणवत्ता कमी करणारा प्रकार असल्याचे हिंदुस्थानचे माजी प्रशिक्षक विमल पुमार यांनी म्हटले आणि या निर्णयावर संताप व्यक्त केला. ‘21 गुणांची पद्धत हीच खरी कसोटी होती. यात काwशल्य, तंदुरुस्ती आणि मानसिक ताकदीची कसोटी लागायची. वेगवान झालेल्या या खेळाची धार 15 गुणांची पद्धत कमी करेल, असा त्यांनी इशारा दिला.

सामना कमी, तीव्रता धोक्यात

नव्या पद्धतीमुळे सामना लहान होणार आणि साधारण एक गेमइतका खेळ कमी होणार आहे. ‘बॅडमिंटनची खरी ताकद म्हणजे सातत्यपूर्ण तीव्रता-तीच कमी होईल,’ असे मत त्यांनी मांडले.

डबल्स बदलले असते, एकेरी का?

विमल कुमार यांच्या मते, बदल करायचाच होता तर तो दुहेरी गटापुरता मर्यादित ठेवायला हवा होता. एकेरी गट हा खेळाचा आत्मा असून त्यालाच धक्का देणे चुकीचे आहे. पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनीही या बदलाला विरोध दर्शवला. बक्षीस रक्कम, निर्णय पुनरावलोकन प्रणाली आणि खेळाडूंचा आवाज या महत्त्वाच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका झाली. हा निर्णय केवळ नियमबदल नाही, तर बॅडमिंटनच्या आत्म्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतोय.