माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी असताना जाधव यांना हृदय विकाराचा झटका आला आहे. त्यांना नवी दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

जाधव हे त्यांच्या काही कामानिमित्त दिल्ली येथे नितीन गडकरी यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांना भेटण्याकरिता गेले होते. सोमवारी गडकरी यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं आणि यावेळी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. यावेळी गडकरी यांच्या निवासस्थानी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.