गेवराईत माजी आमदार अमरसिंह पंडितांनी उभारले 200 खाटांचे कोविंड सेंटर

गेवराई-बीड जिल्ह्यामध्ये कोरोना गावागावात पोहचला. गेवराई तालुक्यातही रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. याचा ताण शासकीय आरोग्य यंत्रणेवर होवू लागला. कोविड सेंटर अपुरे पडू लागले. अशा परिस्थितीत रूग्णांवर उपचार व्हावेत आणि रूग्णांचे प्राण वाचावेत यासाठी गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी स्वखर्चातून 200 खाटाचे कोविड रूग्णालय गढी येथील शारदा हॉस्पिटलवर रिचार्ज इन्टिट्युट नावाने उभे केले. त्यातील 100 खाटांचे रूग्णालय शनिवारी रूग्णांच्या सेवेत दाखल झाले. उर्वरित 100 खाटांचे रूग्णालय आठवडाभरात पूर्ण होणार आहे.

कोविड पॉझिटीव्ह रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात खाटा अपुऱ्या पडू लागल्यामुळे जयभवानी शिक्षण संकुलात 200 खाटांचे कोविड केअर सेंटर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सुरू केले. पहिल्या टप्प्यात 100 खाटांचे सेंटर कार्यान्वित करून त्याचे लोकार्पण शनिवार दि.17 एप्रिल रोजी झाले. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.महादेव चिंचोळे, डॉ.संजय कदम सहा.पोलीस निरीक्षक संदीप काळे, गटविकास अधिकारी अनिरूद्ध सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

मनोरंजनासह सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर

शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गढी येथे अतिशय प्रशस्त अशा इमारतीमध्ये हे कोविड केअर सेंटर सुरू झाली आहे. या सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामध्ये रूग्णांच्या मनोरंजनासाठी टीव्ही दररोज वर्तमानपत्र, मोबाईल चार्जिंग पॉर्इंट, वाय-फाय चांगल्या दर्जाचे बेड गादी व इतर सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत हे कोविड सेंटर अतिशय सुसज्ज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या