ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची प्रकृती बिघडली, भुवनेश्वरमधील रुग्णालयात दाखल

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष्य नवीन पटनायक यांची तब्येत बिघडली असून त्यांना भुवनेश्वरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, नवीन पटनायक यांनी आपल्याला अस्वस्थत वाटत असल्याचे म्हणाले होते, त्यानंतर त्यांना उपचार आणि देखरेखीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आहे, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, नवीन पटनायक यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु त्यांची तब्येत स्थिर असल्याने त्यांच्या समर्थकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.