
पोलीस दलात भरती करतो असे सांगत पालघर येथील एका तरुणाला सहा लाख 99 हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका माजी पोलिसाला बोरिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रामसिंग डोलगे (59) असे त्या पोलिसाचे नाव असून त्याच्याविरोधात फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहेत. पालघरच्या सफाळे येथे राहणारा वैभव तरे (34) हा महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत असून तो पोलीस भरती होण्यासाठी प्रयत्नशील आहे. वर्ष 2021 मध्ये पोलीस भरतीच्या वेळेस वैभव हा रामसिंग डोलगे आणि हसमुख वाघेला या भामटयांच्या संपर्कात आला. त्यांनी वैभवची लाखो रुपये घेऊन फसवणूक केली होती.