
विक्रोळी कन्नमवार नगर-टागोर नगर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुचिता चिंदरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. सुचिता चिंदरकर यांचा दशक्रिया विधी 29 ऑक्टोबरला शिवाजी पार्क येथे तर बारावे आणि तेराव्याचा विधी 31 ऑक्टोबरला विक्रोळी कन्नमवार नगर येथील राहत्या घरी होणार आहे.



























































