एक गळाला, बाबूल सुप्रियो तृणमूलमध्ये

पश्चिम बंगालमध्ये मागील काही दिवसांपासून भाजपाला एकामागून एक धक्कs बसत आहेत. मोदी सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्री असलेले बाबुल सुप्रिया यांनी भाजपची साथ सोडत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसचे सदस्यत्व घेतले.

केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर पश्चिम बंगाल भाजपातील बडे नेते असलेले बाबुल सुप्रियो यांनी एक फेसबुक पोस्ट करत राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. राजकारणात केवळ समाजसेवेसाठी आलो होतो आणि मार्ग बदलत आहे अशी पोस्ट त्यांनी केली होती. कोणत्याही पक्षामध्ये सहभागी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र अवघ्या दीड महिन्यांतच ते तृणमूल काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या