
भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी उपाध्यक्ष, माजी शाखाप्रमुख राजन महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. निष्ठावंत शिवसैनिक अशी राजन महाडिक यांची ओळख होती. महाविद्यालयीन दिवसांपासून ते भारतीय विद्यार्थी सेनेत सक्रिय होते. नंतर भारतीय विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवले. 1990 ते 1994 या काळात मुंबादेवी येथे ते शाखाप्रमुख होते. 1992 साली शिवसेनेकडून त्यांनी पालिकेची निवडणूक लढवली. ओबेरॉय हॉटेलमध्ये वेटर ते मॅनेजर असा त्यांचा प्रवास होता. राजन महाडिक यांच्या पार्थिवावर कांदिवलीतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 च्या वतीनेही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.