महिला दिनी महिलेची छेड काढून  महिलेसह कुटूंबियांना बेदम मारहाण, 4 जणांविरुध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढदिवस असल्याने कुटूंबियांसह नांदेड रोडवरील मराठवाडा लंच होम या ठिकाणी जेवणासाठी गेलेल्या महिलेची छेड काढून महिलेसह कुटूंबियांना काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 4 जणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रेखा सोमवंशी या पुणे येथून सासू-सासर्‍यांना भेटण्यासाठी आपले पती, मुलगा यांच्यासह लातूरला आलेल्या होत्या. 8 जण ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेत गेले आणि वाढदिवस असल्याने नांदेड रोडवरील मराठवाडा लंच होम येथे जेवणासाठी गेले होते. जेवण करुन बील देत असताना एका व्यक्तीने सोमवशंही यांच्या मैत्रिणीस एका अनोळखी व्यक्तीने धक्का दिला व तो हॉटेलमध्ये पळून गेला. त्याला बाहेर काढा असे काऊंटरवर बसलेल्या हॉटेल मालक यश खराडे यास म्हटले असता त्याने तुम्ही येथे थांबू नका, निघून जा असे म्हटले व त्यांनाच धमकावू लागला. शिवागाळ करु लागला. काठीने त्याने आणि हॉटेलमधील इतर तिघांनी संगनमत करुन फिर्यादीस बेदम मारहाण केली. सोबतचे संतोष इंद्राणी याच्याही डोक्यात काठीने मारहाण केली. रेखा सोमवंशी यांचे पती अमित शर्मा,  मैत्रीण ज्योतीस यांनाही मारहाण केली. पोलीसांनी या प्रकरणी 4 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.