आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

अहमदपूर तालुक्यातील जांब ( तिर्थ ) येथील माधव राजु बलोरे याने आत्महत्या केल्याप्रकरणी त्याच्या आईच्या फिर्यादीवरून सासरवाडीच्या तिघासह अन्य एकावर असा चौघावर गुन्हा दाघल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीना अटक केली आहे .

अहमदपुर तालुक्यातील जांब ( तिर्थ ) येथील माधव राजु बलोरे याचा विवाह नातेवाईकातील पल्लवी हीच्या सोबत झाला होता . त्यांना दोन वर्षाची मुलगी आहे. दरम्यान, माधव व त्याच्या पत्नीमध्ये नेहमी वाद होऊन भांडण होत असे त्यामुळे ती आई – वडीलाच्या सहमतीने माळाकोळी येथे स्वतंत्रपणे राहू लागली १७ मे रोजी माधव बलोरे याने अहमदपूरात विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा २० मे रोजी मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूस सुनेचे वडील व्यंकटी गुडमे, सासू लक्ष्मी गुडमे, मेहूना गोविंद गुडमे, रा. अहमदपूर व अन्य एक अशा चार जणांविरुद्ध कारणीभूत असल्याची फिर्याद माधवची आई मंगलबाई बलोरे यांनी दिली. त्यावरून अहमदपूर पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.