
ऐन गर्दीच्या संध्याकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आणि प्रवाशांना वेठीला धरले. कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर बेतले आहे. लोकल अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वेच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याच्या मुद्द्यावर रेल कामगार सेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. सीएसएमटी स्थानकावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने लोकलसेवा ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईच्या सर्व स्थानकांवर चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तेव्हा सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यान चार प्रवासी धावत्या लोकलमधून पडले असे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी रुळावरून फास्ट लोकलने या प्रवाशांना उडवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.






























































