मेट्रोच्या भिंती रंगवणाऱया चार इटालियन नागरिकांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चारकोप येथील मेट्रो यार्डच्या भिंती रंगवणाऱया चौघांना एमएचबी पोलिसांनी अटक केली. कुडिनी जियान लुका, बाल्डो साचा इटालियाना, स्टारिनेरी डॅनियल आणि पॅपेची पाओलो अशी त्याची नावे आहेत. त्या चौघांच्या चौकशीसाठी लवकरच पेंद्रीय तपास यंत्रणा मुंबईत येणार आहेत.

मूळचे इटालियन नागरिक असलेले कुडिनी, बाल्डो, स्टारिनेरी आणि पॅपेची हे गेल्या महिन्यात मुंबईत फिरण्यासाठी आले होते. 26 सप्टेंबरला पहाटे ते चारकोप परिसरात आले. चारकोप मेट्रो यार्डमधल्या भिंती रंगवण्यासाठी ते नाल्याजवळील भिंत चढून आत शिरले. तेथे त्याने भिंती रंगवल्या. त्यानंतर ते गुजरातला निघून गेले. मेट्रोच्या यार्डमध्ये भिंती रंगवण्याचा प्रकार मेट्रो अधिकाऱयाच्या लक्षात आला. त्याने याची एमएचबी पोलिसांना दिली. मेट्रोच्या अधिकाऱयाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस त्या चौघांचा शोध घेत होते. त्याचदरम्यान त्या चौघांना अहमदाबाद गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती समजताच एमएचबी पोलीस तेथे गेले. त्या चौघांना अटक करून मुंबईत आणले. न्यायालयाने त्या चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी त्या चौघांकडून विविध प्रकारचे कॅमेरे, मेमरी कार्ड आणि कॉलर स्प्रे जप्त केले आहेत. ते चौघे नेमके कोणत्या कारणासाठी मेट्रोच्या यार्डमध्ये गेले होते याचा तपास करण्यासाठी लवकरच केंद्रीय तपास यंत्रणा मुंबईत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते चौघे यापूर्वीदेखील मुंबईत आले होते अशी माहिती समोर आली आहे. बाल्डो आणि डॅनियल हे दोघे डिलिव्हरी बॉय तर कुडिनी आणि पॅपेची हे टॅटू आर्टिस्ट म्हणून काम करतात.