
कर्नाटकात वडिलाने आपल्या सख्ख्या मुलीवर बलात्कार केला आहे. त्यामुळे चार अल्पवयीन मुलांनी मिळून आरोपीचा खून केला आहे.
बेंगळूरूमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी मुलीवर बलात्कार करत होता. काही दिवसांपूर्वी मुलीची आई माहेरी गेली होती, तेव्हा नराधम बापाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
पीडित मुलीने आपल्या एका मित्राला याबद्दल सांगितले. या मित्राने मुलीच्या बापाचा खून करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने आपल्या तीन मित्रांना राजी केले. रविवारी उशीरा रात्री चारही जण मुलीच्या घरी पोहोचले आणि कुर्हाड आणि इतर हत्यारांच्या साहाय्याने आरोपीचा खून केला.





























































