
सिडकोतील दत्त मंदिर चौकात रविवारी सकाळी चौघांनी तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली, यामुळे सिडकोत खळबळ उडाली आहे.
दत्त मंदिर चौकातील पेट्रोल पंपावर रोहित शेळके, सूरज बेडसे, पवन शिगवन हे तिघेजण एकाच मोटारसायकलने आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास अन्य दोन मोटारसायकलवरून चौघेजण आले. या तिघांशी त्यांनी हुज्जत घातली आणि त्यांच्यावर कोयत्याने वार करून ते फरार झाले. तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना कशावरून झाली आणि वार करणारे कोण होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकाराने परिसरात पळापळ झाली, खळबळ उडाली होती.