कश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुपवाडा आणि कुलगाव जिह्यात आज दोन ठिकाणी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या ठिकाणी आणखी दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता असून सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू आहे.

पोलिसांच्या अटकेत असलेल्या शौकत अहमद शेख या दहशतवाद्याने दिलेल्या माहितीच्या आधारे कुपवाडा जिह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या ठिकाणाला घेरले. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत दोघे दहशतवादी ठार झाले. यातील एक पाकिस्तानच्या लष्कर-ए- तोयबाचा दहशतवादी होता. कुपवाडा येथील लोलाब परिसरात हे दहशतवादी लपून बसले होते. दुसऱया चकमकीत पोलिसांबरोबर कुलगाव येथे हाजीपोरो परिसरात दोन दहशतवादी ठार झाले. दरम्यान, कुपवाडा येथे चकमक सुरूच असून आणखी दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात शोधमोहीम सुरू ठेवली आहे, अशी माहिती कश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली.