फॉक्स स्टार हिंदीचा कॉमेडी-ड्रामा ‘लूटकेस’ 31 जुलैला होणार प्रदर्शित!

571

फॉक्स स्टार हिंदीचा आगामी ‘लूटकेस’ जो नुकताच ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने आणि त्याच्या भन्नाट कथानकाने चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती आता हा चित्रपट 31 जुलै, 2020 रोजी चाहत्यांच्या प्रत्यक्ष भेटीला येत आहे.

चित्रपटाला हॉटस्टारवर ओटीटी रिलीजच्या रूपात प्रदर्शित करण्यात येणार आहे. लुटकेस एका मध्यमवयीन मध्यमवर्गीय कुटुंबवत्सल व्यक्तिबद्दलची विनोदी कहाणी आहे, ज्याला एक पैशांनी भरलेली सूटकेस मिळते. कुणाल खेमू, रसिका दुग्गल, रणवीर शौरी, विजय राज आणि गजराज राव द्वारा अभिनीत हा चित्रपट राजेश कृष्णन यांनी दिग्दर्शित केला आहे. फॉक्स स्टार स्टूडियो एवं सोडा फिल्म्स प्रोडक्शंसने या चित्रपटाची निर्मिती केली असून राजेश कृष्णन आणि कपिल सावंत यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या