धार्मिक कट्टरतावादाने त्रस्त फ्रान्सने केल्या 30 मशिदी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

देशात फोफावत जाणाऱया इस्लामिक कट्टरतावादाने त्रस्त फ्रान्सने अखेर कट्टरता रोखण्यासाठी देशातील 30 वादग्रस्त मशिदी बंद केल्या आहेत.

फ्रान्समध्ये गेल्या वर्षभरात 89 संशयास्पद मशिदींची कसून पाहणी केली होती. त्यातील एक तृतीयांश मशिदी देशहितासाठी बंद करण्याचा निर्णय फ्रांस सरकारने घेतला. शिवाय कट्टरतावाद्यांना प्रोत्साहन देणाऱया संघटनांवरही बंदी घातल्याचे फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डार्मानिन यांनी सांगितले. फ्रान्समध्ये वादग्रस्त मशिदी बंद करण्याची मोहीम नोव्हेंबर 2020 मध्ये सुरू करण्यात आली. देशात फुटीरताविरोधी कायदा लागू करण्यापूर्वी कट्टरवाद्यांना आसरा देणारी 650 ठिकाणे बंद करण्यात आली.

फ्रान्स सरकार धार्मिक कट्टरतावादाच्या मुद्दय़ावर होणारा फुटीरतावाद मुळीच खपवून घेणार नाही. म्हणूनच धार्मिक कट्टरतेच्या मदतीने समाजात आणि देशवासीयांत फूट पाडणाऱया 30 मशिदी आम्ही बंद केल्या आहेत.’
z फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डार्मानिन