कश्मीरप्रश्नी बाहेरच्यांनी नाक खुपसू नये! फ्रान्सच्या राष्ट्रपतींचा हिंदुस्थानला मजबूत पाठिंबा

1086

कश्मीरप्रश्न हा हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांनीच सोडवायला हवा त्यामध्ये इतर देशांनी नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये असे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यांनी शुक्रवारी सकाळी फ्रान्सच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी मॅक्रॉन यांनी म्हटले की कश्मीरच्या मुद्दावरून इतर कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये आणि हिंसाचार बोकाळेल असं कामही कोणी करू नये. आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा कश्मीरच्या मुद्दावरून मध्यस्ती करण्यास आपण तयार असल्याचं म्हटलं होतं.

 

आपली प्रतिक्रिया द्या