
सध्या अनेक लोक डिजिटल पेमेंटकडे वळत आहेत. बहुसंख्य लोक रोखीचे व्यवहार करण्यापेक्षा डिजिटल पेमेंटला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र यामध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बँक फ्रॉडची रक्कम मागील काही वर्षांत तीन पटीने वाढली आहे. एका अहवालानुसार, 50 टक्क्यांहून अधिक फ्रॉड हे डिजिटल आणि कार्ड बेस्ड ट्रान्झॅक्शनमध्ये होताहेत. वास्तविक 4 अब्ज डॉलर्समध्ये हे प्रमाण केवळ 1.4 टक्के आहे. म्हणजे छोटय़ा फसवणुकीचे प्रमाण जास्त आहे. एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.
यूपीआय हेदेखील लोकप्रिय ठरत आहे, परंतु स्पॅम करणाऱयांनी यूपीआयकडेही आपला मोर्चा वळवलेला आहे. देशभरात यूपीआयने 3 ट्रिलियन डॉलर एवढे व्यवहार होत आहेत. अहवालानुसार दरवर्षी 10 लाखांहून अधिक छोटे- मोठे फसवणुकीचे प्रकार घडतात. ज्या गुह्यांची नोंद झालेय, त्याची ही आकडेवारी आहे. नोंद न झालेली कित्येक प्रकरणे असतील. फिशिंग अटॅकपासून सिमकार्ड क्लोनिंगसारख्या हायटेक पद्धतीने स्पॅम केले जात आहेत.
यूपीआयचे वैशिष्टय़ म्हणजे कुणीही व्हर्च्युअल आयडी बनवून पैसे मागू शकते. यामध्ये फायदाही आहे आणि नुकसानही. हिंदुस्थानात परिस्थिती गुंतागुंतीची आहे. आपल्या 1.4 अब्ज लोकसंख्येच्या देशात बायोमेट्रिक बेस्ड डिजिटल आयडेंटिटी (आधार) सुविधा आहे. मात्र तरीही आयडेंटिटी चोरी केली जाते. बँका वरचेवर केवायसीच्या नावाखाली कागदपत्रे घेतात. मात्र तरीही बनावट खात्यांचा खेळ संपलेला दिसत नाही. नकली खात्यांचा वापर क्रिप्टो करन्सी, ऑनलाईन सट्टेबाजी, क्रिकेट बेटिंग यामध्ये होतो.
वाढती फसवणूक
आर्थिक वर्ष
2022-23
2023-24
2024-25 (अर्ध वर्ष)
प्रकरणे
7,25,000
13,42,000
6,32,000
रक्कम
5.7 अब्ज
10.9अब्ज
4.9अब्ज