
मेष (ARIES – Friday, june 16, 2023)
बोलताना काळजी घ्या. जवळच्या माणसांसाठी वेळ काढावा लागेल. डोके शांत ठेवून कामे करावी लागतील. घरात शुभ कार्य होईल. जोडीदाराच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. वरिष्ठांना विश्वासात घेऊन अडचणी सोडवा. नवे व्यवहार चातुर्याने करावे लागतील.
शुभरंग : हिरवा
वृषभ (AURUS – friday, june 16, 2023)
अभ्यासाची गोडी लागेल. शेजारधर्म पाळा. तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक खर्च काटकसरीने करावा लागण्याची शक्यता आहे. आव्हानांचा सामना आत्मविश्वासाने कराल.
शुभरंग : केशरी
मिथुन (GEMINI – friday, june 16, 2023)
अकारण धावपळ करू नका. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. बाहेरचे खाणे टाळा. घरगुती जेवण आणि फलाहारावर भर द्या. निष्काळजीपणा करू नका. कुटुंबियांना आपलेसे करून घ्याल. साधलेला संवाद प्रभावी ठरेल. प्रिय व्यक्तिची भेट होईल.
शुभरंग : निळा
कर्क (CANCER – friday, june 16, 2023)
अडचणीतून मार्ग काढाल. कुणाला कमी लेखू नका. पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक करा. बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कोणाच्याही दबावाखाली आर्थिक व्यवहार करू नका. घरातील व्यक्तिंना विश्वासात घ्यावे लागेल. जबाबदारीत वाढ होईल.
शुभरंग : जांभळा
सिंह (LEO – Friday, june 16, 2023)
नवीन जबाबदारी आवडीने पार पाडाल. कष्टाशिवाय काहीही मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. आवाक्याबाहेरचे धाडस करायला जाऊ नका. प्रिय व्यक्तिला त्याच्या आवडीचा पदार्थ खाऊ घाला. आज मारुतीचे दर्शन घ्या. जोडीदारापासून खासगी गोष्टी लपवू नका.
शुभरंग : आकाशी
कन्या (VIRGO – Friday, june 16, 2023)
प्रयत्नात सातत्य ठेवावे लागेल. व्यवसायात भागीदारी जपून करा. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करावे लागेल. प्रकृती स्वास्थ्य जपा. कायदेविषयक प्रश्न सोडवताना काळजी घ्या. घरातील मंडळींची मने जिंकण्याच प्रयत्न कराल. आलेल्या पत्राला विचारपूर्वक उत्तर द्यावे लागेल.
शुभरंग : खाकी
तूळ (TULA- Friday, june 16, 2023)
दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करायला जाऊ नका. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. राग अनावर होणार नाही याची काळजी घ्या. घरातील वाद कोणासमोर काढू नका. घरातच सोडवा. आपले म्हणणे इतरांना पटवून द्यावे लागेल. कुटुंबाच्या आनंदात वाढ होईल.
शुभरंग : नारिंगी
वृश्चिक ( SCORPIO – Friday, june 16, 2023)
वेळेचे पालन करा. दररोज आनंदी राहाल. आहारात फळांचा समावेश करा. घरातील माणसांची मने सांभाळा. तुमच्या प्रगतीच्या आड कोणी येणार नाही याची काळजी घ्या. गुंतवणूक करताना घाई करू नका. अर्थार्जन वाढवण्यासाठी उत्पन्नाचा नवा मार्ग शोधावा लागेल.
शुभरंग : खाकी
धनु (SAGITTARIUS – Friday, june 16, 2023)
तुमचे बेत स्पर्धकांना कळू देऊ नका. निष्काळजीपणा टाळा. मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल. जवळच्या माणसांसाठी वेळ काढावा लागेल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. घराबाहेर जाताना आईवडिलांची काळजी घ्या.
शुभरंग : सोनेरी
मकर (CAPRICORN – Friday, june 16, 2023)
ध्येयाकडे लक्ष ठेवा. एकाग्रतेने अभ्यास करावा लागेल. उत्तम यश प्राप्त करू शकाल. नातेवाईकांशी जुळवून घ्यावे लागेल. घरगुती कामे पटापट पूर्ण कराल. शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. आवाक्याबाहेरची कामे प्रयत्नपूर्वक उरकाल.
शुभरंग : चंदेरी
कुंभ (AQUARIUS – Friday, june 16, 2023)
चिडचिडेपणा कमी करा. आरोग्याकरिता डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरातील लहान मुलांची बाजू विचारात घ्या. सकारात्मक राहा. तुम्हाला मिळालेले यश तुमच्याविषयी सकारात्मक असलेल्या व्यक्तिंना सांगा. इतरांची मने जिंकून घ्याल. चित्त शांत ठेवा.
शुभरंग : खाकी
मीन (PISCES – Friday, june 16, 2023)
वेळेचे भान असू द्या. आध्यात्मिक कार्यात सहभाग घ्याल. मनोकामना पूर्ण होतील. कुटुंबात सलोखा राखा. आवडत्या मैत्रिणीचा सहवास लाभेल. नातेवाईकांच्या नकारात्मक वृत्तीकडे दुर्लक्ष करा. जोडीदाराविषयी मनात शंका घेऊ नका.
शुभरंग : पिवळा




























































