
मेष (ARIES – Saturday, March 18, 2023)
इतरांचे लक्ष वेधून घ्याल. पैशाची कमतरता भासण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. स्वत:साठी वेळ काढाल. आजचा दिवस सुंदर जाईल. जीवनाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार कराल. लोकांशी बोलताना विचारपूर्वक बोला.
शुभरंग : पोपटी
वृषभ (TAURUS – Saturday, March 18, 2023)
वाहत्या पाण्यात नाणी प्रवाहित करा. कोणाशीही वाद घालणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाचे योग आहेत. आजचा दिवस सुखदायक आहे. स्फटिकाचे दागिने परिधान करा. घरातील मोठ्या व्यक्तिंची काळजी घ्या.
शुभरंग : हिरवा
मिथुन (GEMINI – Saturday, March 18, 2023)
उगाचच कोणाला आश्वासनं देऊ नका. पक्ष्यांसाठी दाणापाण्याची व्यवस्था करा. आर्थिक नियोजन करावे लागेल. रिकामा वेळ आवडत्या गोष्टी करण्यात घालवा. प्रिय व्यक्तिशी मनमोकळ्या गप्पा मारायला वेळ मिळेल.
शुभरंग : काळा
कर्क (CANCER – Saturday, March 18, 2023)
लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या, मिठाई असे गोड पदार्थ वाटा. प्रकृती सुधारेल. एखादी आनंदाची बातमी कानी येण्याची शक्यता आहे. सकाळचा वेळ बागकामात घालवाल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : काळा
सिंह (LEO – Saturday, March 18, 2023)
देवळात खडीसाखरेचा प्रसाद वाटा. चांगले दिसण्यासाठी भरपूर मोकळा वेळ मिळेल. वाचनालयात जाऊन आवडती पुस्तके वाचण्यात वेळ घालवाल.
शुभरंग : राखाडी
कन्या (VIRGO – Saturday, March 18, 2023)
पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करा. आजचा दिवस लाभदायक आहे. आर्थिक नियोजनाकरिता योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन घ्या. घरात धार्मिक कार्यक्रम साजरा कराल. प्रिय व्यक्तिची भेट होईल.मित्रमैत्रिणींसोबत छान गप्पा मारण्यात आजची सायंकाळ घालवाल.
शुभरंग : पोपटी
तूळ (LIBRA- Saturday, March 18, 2023)
गुलाबांच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या फुलदाणीत ठेवा. आरोग्य चांगले राहिल. वेळेचा सदुपयोग कराल. स्वत:साठी वेळ काढाल. कलेत प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न कराल.
शुभरंग : खाकी
वृश्चिक ( SCORPIO – Saturday, March 18, 2023)
आजी-आजोबांची सेवा करा. नियमित व्यायाम करा. आराम करण्यासाठी वेळ काढा. आवडत्या कामात यशस्वी व्हाल. कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न कराल. घराजवळील अंगणात आवडत्या झाडाचे रोपटे लावा.
शुभरंग : किरमिजी
धनु (SAGITTARIUS – Saturday, March 18, 2023)
घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. केलेल्या मेहनतीला यश येईल. आवडती व्यक्ती आज तुमच्यासाठी वेळ काढेल. मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी आजची सायंकाळ महत्त्वाची ठरेल. कडुलिंबाचा धूप घरात करा. गुलाबाचे झाड अंगणात लावा.
शुभरंग : पांढरा
मकर (CAPRICORN -Saturday, March 18, 2023)
लांबचे प्रवास करणं टाळा. जुन्या आठवणीत रमाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मनाजोगी खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : जांभळा
कुंभ (AQUARIUS – Saturday, March 18, 2023)
तांब्याच्या ग्लासातले पाणी प्या. कोणाचाही मूड खराब करू नका. नव्या विषयाचा अभ्यास करण्यात रमाल. व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यासाठी योग्य ते बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा.
शुभरंग : मोती
मीन (PISCES – Saturday, March 18, 2023)
अपंग व्यक्तिंना मदत करा. ताणतणाव घेऊ नका. कोणावरही स्वत:ची मते लादू नका. कुटुंबियांसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. विश्रांती घेण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : चंदेरी