
मेष (ARIES – Saturday, May 27, 2023)
मुंग्यांना साखर घाला. आजचा दिवस करमणुकीचा आहे. घरी जंगी पार्टीचे आयोजन कराल. एखाद्या धार्मिक यात्रेमध्ये सहभागी व्हाल. आहारात गुळाचा समावेश करा. व्यवसायात नव्या संकल्पना सुचून त्या कृतीत आणाल. सकाळी सूर्याचे दर्शन घ्या. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे कामे पूर्ण कराल.
शुभरंग : नारिंगी
वृषभ (TAURUS – Saturday, May 27, 2023)
घरातील लहान मुलांबरोबर खेळण्यात वेळ घालवाल. दुखऱ्या अवयवावर चांगला उपाय सापडेल. कोणावरही अनावश्यक नाराज होऊ नका. जोडीदाराची लहानशी मागणी पूर्ण कराल. कामात व्यस्त राहाल. भविष्यात गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्याल.
शुभरंग : पोपटी
मिथुन (GEMINI – Saturday, May 27, 2023)
कुत्र्याला पोळी खाऊ घाला. सायंकाळी आवडत्या उपाहारगृहात भोजनाचा आस्वाद घ्याल. अनोळखी व्यक्तिशी ओळख होण्याची शक्यता आहे. आज स्वत:साठी वेळ काढाल. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. मित्रमैत्रिणींची भेट होईल. सुट्टीत सहलीला जाण्याची योजना आखाल.
शुभरंग : हिरवा
कर्क (CANCER – Saturday, May 27, 2023)
धार्मिक कार्यासाठी शुद्ध तुपाचे दान करा. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. मन उल्हसित करणाऱ्या घटना घडतील. आत्मविश्वास बाळगा. स्वत:ला वेळ द्याल. मिळालेला रिकामा वेळ कलाकौशल्य जोपासण्यासाठी वापराल. सकाळी जिममध्ये जाल. उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका.
शुभरंग : केशरी
सिंह (LEO – Saturday, May 27, 2023)
लहान मुलांना शालोपयोगी वस्तू देऊन मदत करा. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती सुधारेल. घरात आनंददायी बातमी कळेल. रिकाम्या वेळेचा चांगला फायदा करून घ्याल. घरातील मोठ्या थोरामोठ्यांना वेळ द्याल. कावळ्याला दही भाताचा घास ठेवा. वाणसामानाची खरेदी कराल.
शुभरंग : लाल
कन्या (VIRGO – Saturday, May 27, 2023)
चिमण्यांना गोड पदार्थ खाऊ घाला. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. अतिविचार करू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. दररोज सकाळी व्यायाम करण्यासाठी वेळ काढाल. पारिजातकाच्या झाडाला पाणी घाला. स्वप्ने प्रत्यक्षात साकार होतील.
शुभरंग : किरमिजी
तूळ (LIBRA- Saturday, May 27, 2023)
रोज सकाळ संध्याकाळ गणपतीचा जप करा. शारीरिक आजारातून बरे व्हाल. स्पर्धांमध्ये भाग घ्याल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस उत्साहात जाईल. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा मारायला वेळ मिळेल. स्वास्थ्य उत्तम राहिल. आज सायंकाळी बागेत फिरायला जाल.
शुभरंग : मोती
वृश्चिक ( SCORPIO – Saturday, May 27, 2023)
प्रियकराला पिवळे वस्त्र भेट म्हणून द्या. महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तिशी ओळख होईल. नवीन कामासाठी वेळ काढाल. अनुभवी लोकांशी बोलणी होतील. जोडीदार आणि तुमच्यातील भांडण मिटेल. कोणाचाही अनादर करू नका. शारीरिक क्षमता वाढीस लागेल.
शुभरंग : राखाडी
धनु (SAGITTARIUS -Saturday, May 27, 2023)
आर्थिक मदत मिळेल. लोकं तुमची स्तुती करतील. सहकारी कौतुक करतील. घरातील भावंडांशी प्रेमाने वागा. कलाकौशल्यात प्रगती कराल. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. मौल्यवान वस्तूची खरेदी कराल. पिंपळाच्या झाडाजवळ सायंकाळी दिवा लावून मनातील इच्छा व्यक्त करा.
शुभरंग : पांढरा
मकर ( CAPRICORN – Saturday, May 27, 2023)
घरातील जुनं आणि नको असलेलं सामान काढून टाका. जोडीदाराकडून महागडी भेटवस्तू मिळेल. विष्णुसहस्त्रनामावलीचे वाचन करा. शांततेचा तुमच्या मनात वास राहील. घरातील वातावरण आनंददायी असेल. काचेच्या बाटलीतील पाणी प्या.
शुभरंग : खाकी
कुंभ (AQUARIUS – Saturday, May 27, 2023)
अति मांसाहार टाळा. विश्रांतीसाठी वेळ काढा. मोबाईलचा चुकीचा वापर करू नका. मौल्यवान वस्तूची काळजी घ्या. निसर्गाचा आनंद घ्याल. मातीच्या माठातलं पाणी प्या. घरात सुगंधी अत्तर शिंपडा, धूप करा. मिळालेली संधी सोडून नका.
शुभरंग : सोनेरी
मीन (PISCES -Saturday, May 27, 2023)
घराच्या परिसरातील झाडाझुडपांची काळजी घ्या. अचानक धनलाभाची शक्यता आहे. घरात समारंभाचे वातावरण राहील. जोडीदाराचा मूड छान असेल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक असेल. लोकांशी बोलताना मधुरावाणीचा वापर करा. कोणालाही नाराज करू नका. मन:स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा करा.
शुभरंग : चंदेरी




























































