
विजेचे बिल पाहून अनेकांचा डोळे पांढरे होतात. परंतु, फ्रान्समध्ये सरकारने अचानक नागरिकांना काही तासांसाठी वीज मोफत केली. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात झालेल्या प्रचंड वाढीमुळे सरकारने हा निर्णय घेतला. फ्रान्समध्ये सोसाटयाचा वारा सुटल्यामुळे पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये विजेचे उत्पादन वाढले. अतिरिक्त वीज जमा झाली. मात्र लोकांनी विजेचा वापर केला नाही. पुरवठा जास्त झाल्यामुळे तात्पुरता ऊर्जा अधिशेष निर्माण झाला. विजेचे दर शून्यावर आल्याने लोकांना मोफत वीज मिळाली.



























































