फ्रेंच ओपनमध्ये 60 टक्के टेनिसप्रेमींनाच प्रवेश

355

कोरोनाच्या संकटामुळे एरव्ही मे – जून या कालावधीत आयोजित करण्यात येणारी फ्रेंच ओपन ही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा आता 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र कोरोनाता प्रार्दुभाव अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेसाठी स्टेडियममध्ये फक्त 60 टक्के टेनिसप्रेमींनाच प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती फ्रेंच फेडरेशनचे अध्यक्ष बर्नाड गिऊडीसेली यांनी दिली.

बर्नाड गिऊडीसेली पुढे म्हणाले, स्टेडियममधील मेन कोर्टवर कमीतकमी चार जणांनाच बसण्याची परवानगी असणार आहे. दोघांमध्ये एक खुर्ची रिकामी ठेवावी लागणार आहे. इतर बदल करण्यात येणार आहेत. याचा अर्थ सुरुवातीच्या फेऱयांमध्ये 20 हजार टेनिसप्रेमी लढतींचा आनंद घेऊ शकणार आहेत.

सप्टेंबर महिन्यापासून तिकीट विक्री
आम्ही स्पर्धेच्या दरम्यान सर्वांच्याच सुरक्षेची काळजी घेणार आहोत. स्टेडियममध्ये येणाऱया प्रत्येकालाच मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यास सप्टेंबर महिन्यापासून नव्या तिकीट विक्रीला सुरुवात करणार आहोत, असे बर्नाड गिऊडीसेली यांनी सांगितले.

अमेरिकन ओपन प्रेक्षकांविनाच
फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी 60 टक्के टेनिसप्रेमींना परवानगी देण्यात आली असली तरी अमेरिकन ओपन ही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा प्रेक्षकांविनाच पार पडणर आहे. 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत होणाऱया या स्पर्धेत टेनिसप्रेमींना यामध्ये होणाऱया लढतींचा आनंद घेता येणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या