
सामना प्रतिनिधी । पॅरिस
फ्रान्समध्ये इंधन दरवाढी विरोधात सुरु असलेल्या ‘यलो वेस्ट’ आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. या आंदोलकांनी आता पोलिसांच्या अंगावर मानवी विष्ठा फेकण्याचे उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे आंदोलकांच्या ‘मानवी विष्ठा बॉम्ब’चा माऱ्याचा सामना करण्याचे नवे आव्हान फ्रेंच पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
शनिवारी फ्रान्समधे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलकांनी मानवी विष्ठा भरलेल्या पिशव्या पोलिसांच्या तोंडावर फेकल्या यामुळे पोलीस कर्मचारी किळस येऊन दूर पळत आहेत. आतापर्यंत पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक पातळीवर इंधनाच्या किंमतीत चढ-उतार होत आहेत. मात्र फ्रान्समध्ये गेल्या वर्षभरात इंधनाच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांचा सरकार विरोधात रोष आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून फ्रान्समध्ये ‘यलो वेस्ट’ आंदोलनात सुरू झाले आहे.



























































