‘ती’च्या मुळे झाली औरंगजेबची हत्या, मैत्रिलाच बनवलं हत्यार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी हिंदुस्थानी जवान औरंगजेबचे अपहरण करून त्याची निघृणपणे हत्या केली होती. याप्रकरणाचा तपास करत असताना दोन महत्वाच्या आणि गंभीर बाबी समोर आल्या आहेत. एक म्हणजे औरंगजेबची एका स्थानिक मुलीशी असलेली मैत्री आणि दुसरं नियमांचं उल्लंघन. औरंगजेबची एका मुलीसोबत मैत्री झाली होती, घरी जाण्यापूर्वी तो तिला भेटणार होता. मात्र याच मैत्रीणीला धमकावत दहशतवाद्यांनी औरंगजेबची माहिती मिळवल्याचे समोर आले आहे.

औरंगजेब हा गेल्या काही महिन्यांपासून एका मुलीच्या संपर्कात होता. त्यांची मैत्री होती. ईद निमित्त घरी जाण्यापूर्वी आपल्या मैत्रीणीला तो भेटणार होता. याचीच कुणकुण दहशतवाद्यांना देखील लागली होती. त्यामुळे दहशतवाद्यांनी औरंगजेबच्या मैत्रीणीला ताब्यात घेत तिच्याकडून औरंगजेबची माहिती मिळवली. औरंगजेब घरी कधी आणि कसा जाणार आहे, त्याच्यासोबत कोण असणार आहेत, तिला तो कुठे भेटणार आहे याची संपूर्ण माहिती दहशतवाद्यांनी औरंगजेबच्या मैत्रीणीकडून घेतली होती.

औरंगजेबने केले होते नियमांचे उल्लंघन
कश्मीर खोऱ्यातील जवानांना त्यांच्या युनिट बाहेर पडताना बुलेट प्रुफ गाडीनेच प्रवास करायचा असतो. ते कश्मीर खोऱ्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत ते खासागी वाहनाने प्रवास करू शकत नाही. मात्र औरंगजेब एका खासगी गाडीने प्रवास केला. औरंगजेबला त्याच्या मैत्रीणीला भेटायला जायचे असल्याने त्याने लष्कराच्या गाडीने प्रवास न करता खासगी गाडीने केला व तिथेच त्याचा घात झाला, अशी माहिती मिळते आहे.