पपई खाल्ली म्हणून फळ विक्रेत्याने गायीच्या पोटात खुपसला चाकू, आरोपी तौफीकला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायीने पपई खाल्ली म्हणून फळविक्रेत्याने गायीच्या पोटात चाकू खुपसला आहे. त्यात गाय गंभीर जखमी झाली असून आरोपी तौफीक बशीर मुजावरला अटक करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात तौफीक बशीर मुजावर याचे फळ विकण्याचा व्यवसाय होता. तेव्हा एका गायीने तौफिकच्या दुकानातील पपई खाल्ली. तौफिकला याचा राग आला आणि त्याने गायीच्या पोटात चाकू खुपसला इतकेच नाही तर गायीच्या पायावरही चाकूने वार केले.

या प्रकरणी पोलिसांनी तौफिकला अटक केली आहे. तसेच गायीला प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार केले.