पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरूच पेट्रोल 9 तर डिझेल 16 पैशांनी महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरूच आहे. रविवारी पुन्हा पेट्रोल 9 पैशांनी तर डिझेल 16 पैशांनी वाढले. ताज्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 90.84 रुपये प्रति लिटरलर गेला असून डिझेल 79.40 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहे. तर दिल्लीत पेट्रोल 83.49 रुपये प्रति लिटर, डिझेल 74.79 रुपये प्रति लिटर झाले आहे.

सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येतो आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला इंधन दरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमने गेल्या कर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हा दररोज सकाळी 6 वाजता इंधन दराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.