
व्यापाऱ्याच्या दुकानातून 44 लाख रुपये चोरीप्रकरणी नोकराला एल.टी. मार्ग पोलिसांनी अटक केली. रितलालप्रसाद जगदीश महतो ऊर्फ वर्मा असे त्याचे नाव आहे. त्याने तीन वर्षांत 44 लाख रुपये चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
तक्रारदार मिठाईचा व्यापारी असून त्याचे भुलेश्वर परिसरात दुकान आहे. त्याच्या दुकानात रितलालप्रसाद हा काम करत होता. डिसेंबर महिन्यात तक्रारदार यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तेव्हा एका फुटेजमध्ये रितलालप्रसाद हा दुकानातील पैसे खिशात टाकत असल्याचे दिसले. रितलालप्रसादने चोरी कबूल केल्यावर तक्रारदार यांनी रितलालप्रसादविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. या घटनेनंतर रितलालप्रसादला हा पळून गेला. पोलिसांनी रितलालप्रसाद झवेरी बाजार परिसरातून अटक केली.




























































