अकरावीच्या दुसऱया विशेष फेरीला सुरुवात 4 ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑkनलाईन प्रवेशाच्या दुसऱया विशेष फेरीला सुरुवात झाली असून 4 ऑगस्टला सकाळी 10 वाजता गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विद्यार्थी उद्या बुधवार, 2 ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी नव्याने नोंदणी करू शकतात. तसेच ऑप्शन फॉर्म भरू शकतात किंवा अर्जात बदल करू शकतात

अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंत चार प्रवेश फेऱया पार पडल्या असून आतापर्यंत 2 लाख 13 हजार 318 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पहिल्या विशेष फेरीत प्रवेश न मिळालेल्या 32 हजार 28 विद्यार्थ्यांना दुसऱया विशेष फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. तसेच एटीकेटीचे विद्यार्थीदेखील या प्रवेशासाठी अर्ज करू शकणार आहेत. दुसऱया गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 4 ते 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.

पहिल्या विशेष फेरीत 61,147 प्रवेश

पहिल्या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया संपली असून या फेरीत एकूण 61 हजार 147 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नियमित फेरीच्या दुसऱया आणि तिसऱया फेरीपेक्षा विशेष फेरीत प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विशेष फेरीसाठी एकूण 1 लाख 84 हजार 357 जागा उपलब्ध होत्या. या जागांवर प्रवेशासाठी 93, हजार 202 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यांपैकी 80 हजार 039 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, तर 61 हजार 174 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. 30 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले असून 435 विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. विशेष फेरी-1 नंतर अकरावीच्या 1 लाख 23 हजार 183 जागा या रिक्त राहिल्या आहेत