
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत उद्या संपणार आहे. अद्याप प्रवेशासाठी नोंदणी न केलेले तसेच कॉलेज पसंतीक्रम भरू इच्छिणारे विद्यार्थी उद्या रात्री 11 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. आतापर्यंत मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिकेतंर्गत एकूण 2 लाख 72 हजार 642 विद्यार्थ्यांची ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी 23 ते 24 ऑगस्टदरम्यान जाहीर होण्याती शक्यता आहे. सर्वसाधारण यादीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत आपण कोणत्या स्थानावर आहोत, हे समजणार आहे. तसेच या यादीनुसार विद्यार्थ्यांना अर्जात काही चुका असल्यास त्या दुरुस्तीची संधीदेखील दिली जाणार आहे. त्यानंतर 27 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
विभागनिहाय आलेले अर्ज
विभाग नोंदणी केलेले अर्ज भरलेले
अमरावती 10190 7512
मुंबई 230053 180910
नागपूर 25521 17181
नाशिक 21266 14994
पुणे 73932 52045
एकूण 360962 2,72,642



























































