जी-20चे सूप वाजले, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसाठी मोदींचे साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कालगतीनुसार जे बदलत नाहीत ते संदर्भहीन होतात, महत्त्व गमावून बसतात, नष्ट होतात हे लक्षात घेऊन बदलत्या जगासोबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीसह जागतिक स्तरावरील सर्वच संस्था-संघटनांमध्ये बदल घडवून आणायला हवेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जी-20 परिषदेच्या समोरापप्रसंगी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत हिंदुस्थानला सदस्यत्व मिळावे यासाठी जोरदार बाजू मांडली.

परिषदेचे सूप वाजल्याचे समारोप सत्रात जाहीर करताना मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनॅशिओ लुला डा सिल्वांकडे पुढील वर्षाच्या अध्यक्ष पदाची सूत्रे आणि मानदंड सुपुर्द केला. दिल्लीतील परिषदेत घेतलेले निर्णय आणि सूचनांची अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यासाठी येत्या नोव्हेंबरअखेरीस जी-20 गटाचे ऑनलाईन अधिवेशन घेण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

51 संस्थापक सदस्यांनी राष्ट्रसंघाची स्थापना केली तेव्हा जग पूर्णपणे वेगळे होते. राष्ट्रसंघाचे आज सुमारे 200 सदस्य आहेत. पण सुरक्षा समितीत स्थापनेपासून जेवढे सदस्य होते तेवढेच सदस्य आताही आहेत. आता जग बदलले आहे तेव्हा सुरक्षा समितीतही कायमस्वरूपी सदस्य देशांची संख्या वाढली पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले. जागतिकदृष्टय़ा महत्त्वाच्या संस्थांमध्ये बदल घडवून आणण्याच्या मोदी यांच्या आवाहनाचा पुनरुच्चार लुईस इनॅशिओ यांनीही केला. संयुक्त राष्ट्रांचे राजकीय सामर्थ्य पुन्हा मिळवण्यासाठी सुरक्षा समितीत नवीन विकसनशील देशांना स्थायी आणि अस्थायी सदस्यत्व मिळायला हवे, असे ते म्हणाले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुतेरेस यांच्यासह जी-20 शिखर परिषदेसाठी आलेल्या विविध देशांच्या नेत्यांनी रविवारी सकाळी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. पावसाच्या सरी झेलणाऱया राजघाटावर मोदींनी या सर्वांचे खादीची शाल देऊन स्वागत केले. या नेत्यांनी राजघाटावरील शांतता भिंतीवर स्वाक्षऱयाही केल्या. शांतता, सेवा, करुणा आणि अहिंसेचे प्रेरणास्थान असणाऱया गांधीजींना जी-20 परिवाराने आदरांजली अर्पण केली, असे ट्विट यासंदर्भात नंतर मोदी यांनी केले.

विविध नेत्यांशी द्वीपक्षीय चर्चा

फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीच्या चॅन्सलर ओलाफ श्लोझ आणि पॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टडीउ यांच्यासह परिषदेला उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांशी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्यांवर द्वीपक्षीय चर्चा केली. गुंतवणूक, व्यापार उद्योग, संरक्षण व अन्य क्षेत्रातील सहकार्याबद्दल ही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. द. कोरिया, तुकाaये, आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांशीही मोदींनी चर्चा केली.