गडचिरोली जिल्ह्यात सीआरपीएफचे नवे 11 कोरोना पॉझिटिव्ह, तर 1 आरोग्य कर्मचारीही बाधित

कृषी महाविद्यालय येथील सीआरपीएफ बटालियनमधील 11 नवे बाधित व गडचिरोली येथीलच विलगीकरणात असलेला आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत. सदर आरोग्य कर्मचारी कुरखेडा येथील कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. काही कामानिमित्त गेल्या आठवड्याभरापूर्वी जिल्हा बाहेर प्रवास करून आलेला होता. त्यांना गडचिरोली येथील विलगीकरण ठेवण्यात आले होते.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती

  • आजचे पॉझिटिव्ह – 20
  • कोरोना ऍक्टीव्ह असलेले रुग्ण -114
  • बरे होऊन डिस्चार्ज दिले -71
  • एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 186
  • एकूण मृत्यू – 01
  • दवाखान्यात उपचारामध्ये – 114

या व्यतिरीक्त गडचिरोली जिल्हयात जिल्हयाबाहेरील 9 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या