गाडगेमहाराज पुण्यातिथी महोत्सव प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरगरीब व अंध, अपंग दीनदुबळ्यांचे दैवत असलेले श्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला गाडगे नगरातील गाडगे महाराज समाधी मंदिरात प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने गाडगेनगरमध्ये यात्रा भरली आहे.

शनिवार (14 डिसेंबर) पासून सुरू झालेल्या या यात्रेला जिल्ह्यातील अनेकांनी हजेरी लावली. विविध झुले व रंगबेरंगी रोषणाई नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. यात्रेतील हे मनोहारी छायात्रिकार अक्षय नागापुरे यांनी दृश्य टिपले आहे.