कबड्डी, बॉडीबिल्डिंगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावा – गजानन कीर्तिकर z

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कबड्डी हा खेळ हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात खेळला जात असून एकटय़ा मुंबई उपनगरात 600 हून अधिक नोंदणीकृत संस्था आहेत. यावरून कबड्डीची व्याप्ती स्पष्ट होते. त्यामुळे या खेळाला चांगले दिवस यावेत म्हणून पेंद्र सरकारने कबड्डीबरोबरच बॉडीबिल्डिंगचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर यांनी क्रीडा युवक कल्याण लक्षवेधीवर बोलताना संसदेत केली.

देशात होतकरू खेळाडूंची संख्या मोठी असून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याची सूचना गजानन कीर्तिकर यांनी क्रीडा युवक कल्याण लक्षवेधीवर बोलताना मांडली. हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटना व नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन या दोन्ही संस्था पेंद्र सरकारच्या आहेत. प्रत्येक जिल्हा व राज्य संघटनांना यांची मान्यताप्राप्त करून घ्यावी लागते. नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसी राबवण्यासाठी पेंद्र सरकार त्यांच्या संलग्न संस्था, असोसिएशनने एकत्रित काम करणे गरजेचे असल्याचे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. तसेच बॉडीबिल्डिंग, कराटे, तायक्वाँदो आणि इतर क्रीडा प्रकार यांच्या दोन संघटना कार्यरत आहेत, त्याऐवजी एकच मान्यताप्राप्त संघटना असावी अशी मागणीही त्यांनी केली. खेळांना आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे आहे. त्याकरिता पेंद्र आणि राज्य शासनाने जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, कॉर्पोरेट फंडासाठी प्रयत्न करावेत. खासगी पंपन्यांनी क्रीडा प्रकार दत्तक घ्यावेत अशा सूचना कीर्तिकर यांनी केल्या आहेत.

खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून नियमावली तयार करावी
देशातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळावे बँका, इन्शुरन्स पंपन्या, ऑइल पंपन्या व इतर सीएसआर फंडातून आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून पेंद्र सरकारने कायदा करावा अशी सूचना गजानन कीर्तिकर यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांना शाळेपासूनच क्रीडा प्रशिक्षण देणे बंधनकारक करावे, क्रीडा संघटना व सरकारमध्ये समन्वय असावा, सर्व सरकारी आस्थापनांमध्ये कबड्डी, खो-खो, बॉडीबिल्डिंगचे संघ गठीत करण्यात यावेत असेही स्पष्ट केले आहे.