2024 मध्ये 6 मजूर, डॉक्टरला मारणारेच पहलगाम हल्ल्यामागे

गेल्या वर्षी जम्मू आणि कश्मीर गंदरबल जिह्यात सहा मजूर आणि एका डॉक्टरची हत्या करणारे दहशतवादीच पहलगाम हल्ल्यातही होते अशी माहिती समोर आली आहे. 2024 मध्ये सोनमर्ग येथील बोगद्याजवळ दहशतवाद्यांनी मजूर आणि डॉक्टरवर हल्ला केला होता. दोन्ही हल्ले पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी संघटनेने केले. लष्करचा दहशतवादी हाशिम मुसा ऊर्फ सुलेमान याने मजुरांवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता अशी माहिती उघड झाली आहे.