
मिर्ची ग्रुप आणि गणेशगल्ली मित्रपरिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणेशगल्ली प्रीमियर लीग मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत स्थानिक गणेशगल्ली जायंट्स संघाने हॅपी वॉरियर संघावर चुरशीची मात करीत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून अनिकेत शर्मा उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रथमेश मुणगे तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सर्वेश सावंत यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी नगरसेवक अनिल कोकीळ, सिद्धिविनायक मंदिर न्यासचे सदस्य राजाराम देशमुख, विजय तावडे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेशगल्ली मित्रपरिवाराचे अध्यक्ष किरण तावडे, उपाध्यक्ष विराज मांडखोलकर, सरचिटणीस कृणाल सावंत, खजिनदार प्रथमेश कदम हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजीत सावंत, धीरज जैन, संजय सावंत, शशांक पाटील, नितीन दळवी, अभिषेक शिवलेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
























































